कोल्हापूरच्या महापौरांना 16 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

January 30, 2015 9:53 PM0 commentsViews:

trupti malvi30 जानेवारी : शहराच्या पहिल्या नागरीक म्हणून पाहिल्या जाणार्‍या महापौरांनीच आता भ्रष्टाचाराला खतपाणी घातलंय. कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी यांना 16 हजारांची लाच घेतल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून तृप्ती माळवी यांना ताब्यात घेतलंय. तृप्ती माळवी यांनी 40 हजारांची लाच मागितली होती. हा सगळा व्यवहार माळवी यांच्या पीएने केला. 40 हजारांपैकी 16 रुपये आज देण्यासाठी आले असता त्यांच्या पीएला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतलं.

कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलीये. शहरातल्या शिवाजी पेठेतल्या माळी गल्लीत एका नागिरकांची जमीन ही रस्ता तयार करताना संपादित करण्यात आली होती. त्यानंतर ही जमीन परत मिळावी यासाठी या नागरिकानं महापौरांकड अर्ज केला होता. पण महापौर माळवी आणि त्यांचा स्विय सहाय्यक अश्वीन गडकरी यांनी त्याच्याकडे 40 हजार रुपयांची मागणी केली. हा सगळा प्रकार त्या नागिरकांनं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यानंतर आज दुपारी त्यानं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधून सापळा रचण्याची विनंती केली. आणि या व्यवहारातील 16 हजार रुपये देताना महापौरांच्या पीएला रंगेहाथ पकडण्यात आलंय. सध्या या पीएला ताब्यात घेण्यात आलं असून महापौरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र त्यांना अद्याप अटक झाली नसून उद्या त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान या कारवाईमुळे महापालिकेत खळबळ उडाली असून ही बातमी शहरात पसरल्यानं एसीबीच्या कार्यालयासमोर नागिरकांनी मोठी गर्दी केली होती.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close