राणेंना धक्का, संजय पडते शिवसेनेत करणार प्रवेश

January 30, 2015 9:05 PM0 commentsViews:

sanjay padte30 जानेवारी : कोकणात काँग्रेसचे नेते नारायण राणेंना आणखी एक धक्का बसलाय. राणेंचे कट्टर समर्थक संजय पडते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि कुडाळच्या सरपंच स्नेहल पडतेही शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

शनिवारी दुपारी 12 वाजता ‘मातोश्री’वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितित हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. काँग्रेसमध्ये कोंडी होत असल्यामुळे आणि आपल्याला त्रास देण्यात येत असल्याने शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं संजय पडते यानी सांगितलंय.

पडतेंचा शिवसेना प्रवेश हा राणेना सिंधुदुर्गात आणखी एक धक्का मानला जातोय. आपल्या सोबत मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते शिवसेनेत येतील असा दावाही संजय पडते यानी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close