मिरज दंगलीला सरकारने जातीय स्वरुप दिलं- गोपीनाथ मुंडे

September 8, 2009 1:35 PM0 commentsViews: 13

8 सप्टेंबर मिरजमधल्या दंगलीला सरकारनेच जातीय स्वरुप दिल्याचा आरोप भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. मिरजकडे निघालेल्या मंुडेंना पोलिसांना रोखलं होतं. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपलीही भूमिका मांडली. सांगली-मिरजमधली परिस्थिती आटोक्यात आणण्यात पोलिसांना अपयश आल्याचा आरोप मुंडेंनी यावेळी केला. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला आपण उपस्थित राहणार आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

close