पुन्हा एकदा महाराष्ट्राची उपेक्षा, केंद्राकडून मदत नाहीच !

January 31, 2015 9:12 PM0 commentsViews:

Image img_73842_drought_240x180.jpg31 जानेवारी : गारपीट आणि अवकाळी पावसाने हैराण झालेल्या शेतकर्‍यांना मदत तर दूरच पण एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती कृती दलाच्या बैठकीत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत. महाराष्ट्राने केंद्राकडे मदतीसाठी 6 हजार कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. पण, एनडीआरएफने मदतचा विचार केलाच नाही. जम्मू काश्मीर, केरळ, मेघालय, नागालँड, ओडिशा, आंध्र प्रदेश, हरयाणा या राज्यांना मदत देण्यात येणार आहे.

गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात अस्मानी संकटाने कहर केला. गारपीट, अवकाळी पाऊस आणि त्यातच पाणी टंचाई, दुष्काळ त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हैराण झालाय. वर्षाच्या शेवटलाही गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचं तोंडच पाणी पळवलंय. राज्य सरकारने 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. आणि केंद्राकडे 6 हजार कोटींची मागणी केलीये. मात्र, केंद्राने राज्य सरकारच्या मागणीकडे सपशेल पाठ फिरवल्याचं दिसून येतंय. एनडीआरफने दुसर्‍यांदा बैठक घेतली पण या बैठकीत पुन्हा एकदा महाराष्ट्राची उपेक्षा करण्यात आली. एनडीआरएफच्या शुक्रवारच्या बैठकीत महाराष्ट्राला मदत दिली गेली नाही. जम्मू काश्मीर, केरळ, मेघालय, नागालँड, ओडिशा, आंध्र प्रदेश, हरयाणा या राज्यांना मदत देण्यात येणार आहे. एनडीआरएफच्या 20 दिवसांत दोन बैठका झाल्या पण या दोन्ही बैठकांत महाराष्ट्राला देण्यात येणार्‍या मदतीचा उल्लेखही करण्यात आला नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close