अशी आहे शक्तीशाली ‘अग्नी 5′

January 31, 2015 7:19 PM0 commentsViews:

agni 5_fetcher31 जानेवारी : भारताने आज (शनिवार) अणू ‘अग्नी-5′ या सर्वात ताकतवान क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पाच हजार किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावर मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राचे ओडिशा जवळील व्हीलर द्वीप इथं यशस्वी चाचणी करण्यात आली. डीआरडीओने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राचा पहिला यशस्वी प्रयोग 19 एप्रिल 2012 ला झाला होता. ‘अग्नी -5′ मुळे ज्यांच्याकडे 5 हजार किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहेत, अशा निवडक सहा देशांमध्ये भारताची गणना केली जाणार आहे. आपल्या सैन्याला अधिक शक्तीशाली बनवण्यासाठी याच वर्षी सैन्याकडे हे मिसाईल सोपवण्यात येणार आहे.

अग्नी-5 चे वैशिष्ठ्यं
1. 5 हजार किलोमीटर पेक्षा जास्त लांब मारा करणारे क्षेपणास्त्र
2. इतक्या लांब मारा करणारे हे पहिलेच क्षेपणास्त्र
3. अग्नी-5 ची मांडणी ही तीन टप्प्यात केली असून 17 मीटर इतकी लांबी आहे.
4. 20 मिनिटांत 5 हजार किलोमीटरचा टप्पा गाठू शकते
5. हे क्षेपणास्त्र दीड मीटर म्हणजेच छोट्या कारसारख्या गोष्टींवरही निशाणा साधू शकतं
6. याच्या लाँचिंग सिस्टीम मध्ये कँनिस्टर तंत्रज्ञानाचा वापर केला गेलाय.
7. ज्यामुळे या क्षेपणास्राला कुठेही सहजरीत्या ट्रान्सपोर्ट करता येऊ शकतं
8. क्षेपणास्त्राला रस्त्यावरूनही लाँच केलं जाऊ शकतं

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close