26/11 संदर्भात नारायण राणेंना नोटीस

September 8, 2009 1:36 PM0 commentsViews: 4

8 सप्टेंबर26 /11च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी मुंबई हायकोर्टाने नारायण राणेंना नोटीस बजावली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांना आपल्याच राजकीय नेत्यांनी मदत केली होती, असा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला होता. त्यावर कोर्टाने राणे यांना 'नुसते आरोप करु नका, तर हे आरोप कोणत्या आधारार केले ते स्पष्ट करा', असा आदेश देण्यात आला आहे. शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टानं हे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती बिलाल नाईक आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणंी सुरु आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. न्यायमूतीर्ंनी या प्रकरणाची सुनावणी आता 14 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

close