‘आयसिस’कडून जपानी पत्रकाराचा शिरच्छेद

February 1, 2015 1:37 PM0 commentsViews:

ISIS JAPAN REPORTER KILLED

01 फेब्रुवारी :  इराक आणि सीरियामध्ये सक्रिय असलेल्या आयसिसया दहशतवादी संघटनेची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आयसिसने जपानी पत्रकार केंजी गोतो याचा शिरच्छेद केल्याच्या व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. पत्रकार केंजी गोतो याला आयसिस ओलिस ठेवले होते. आयसिस ने त्यांच्या वेबसाइटवर हा व्हिडिओ रिलीज केला असून तो सोशल मीडियावरही पोस्ट करण्यात आला आहे.

आयसिससमोर झुकणार नसल्याचे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यव यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी देखील आयसिसच्या क्रुरकृत्यावर टीका केली आहे.

आयसिसने दोन जपानी पत्रकारांना ओलिस ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी आयसिसने 72 तासांच्या आत 200 अमेरिकन डॉलर्स देण्याची मागणी जपान सरकारकडे एका व्हिडिओ क्लिपद्वारे केली होती. मात्र, या मागणीला जपान सरकारने स्पष्ट नकार दिला होता. आयसिस दहशतवाद्यांचा कोणतीही मागणी मान्य केली जाणार नाही, असाही इशारा जपान सरकारतर्फे देण्यात आला होता. त्यानतंर ISIS ने केंजी गोतो याचा शिरच्छेद केला.

व्हिडिओमध्ये पत्रकार गोतो नारंगी रंगाच्या कपड्यात दिसत आहे. शेजारी आयसिसचा दहशतवादी उभा आहे. पत्रकार गोतो यांच्या हत्येला जपानचे पंतप्रधान जबाबदार असल्याचे देखील आयसिसने म्हटले आहे.

दरम्यान, आयसिसला विरोध करणार्‍या देशांना जपान आर्थिक मदत करतोय, आणि यामुळेच आयसिसचा जपानवर राग आहे. पण आपण ही मदत सुरू ठेवणार असल्याचं जपानसरकारनेही स्पष्ट केले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close