जेटचे पायलट सामूहीक रेजवर

September 8, 2009 1:39 PM0 commentsViews: 5

8 सप्टेंबर जेट एअरवेजच्या दोन पायलट्सना काढून टाकण्याच्या निर्णयाविरोधात जेट एअरवेजचे पायलट मंगळवारी सकाळपासून सामूहिक रजेवर गेले आहेत. सर्वांनी एकत्र सीक लिव्ह घेतल्याने विमानसेवा कोलमडली आहे. जे पायलट भारताबाहेर आहेत, ते भारतात परतून मग सीक लिव्हवर जाणार आहेत. जेट एअरवेजच्या तब्बल 235 तर जेट कोनेक्टच्या 130 फ्लाईट्सवर याचा परिणाम होणार आहे. तर सुमारे 13 हजार प्रवासी या संपामुळे अडचणीत आलेत. अशा प्रवाशांना दुसर्‍या एअरलाईन्सची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मंगळवारच्या तिकिटावर दुसर्‍या एअरलाईन्सचा पर्याय नको असणार्‍या प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत दिले जात आहेत. तसंच मंगळवारच्या तिकिटाऐवजी पुढील कोणत्याही दिवसाचं तिकीट घेण्याचाही पर्याय जेटनं प्रवाशांना दिला आहे. दरम्यान विमानतळांवर प्रवाशांची गर्दी वाढत असल्यामुळे प्रवाशांना माहिती देण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. जेट एअरवेज मॅनेजमेंटनंही प्रवाशांच्या या गैरसोयीबद्दल कालच दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान नागरी उड्डाण खात्यातर्फे जेट पायलटस्‌च्या संपाच्या मुद्द्यावर नुकतीच एक बैठक घेण्यात आली. हा संप शांततापूर्ण परिस्थितीत मिटवावा तसंच जेटचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी पायलटस्‌शी बोलणी करावीत असं सरकारतर्फे सुचवण्यात आलं आहे.

close