इंटरनेटवरून होणार्‍या दहशतवादाच्या प्रचाराविरोधात ‘एटीएस’चं नवं मिशन

February 1, 2015 11:37 AM0 commentsViews:

facebook terror

01 फेब्रुवारी :  दहशतवादाला लगाम घालण्यासाठी जितके पर्याय समोर येत आहेत, तितक्याच दहशतवादाच्या वाटाही पसरत जात आहेत. त्यामध्ये सोशल मीडिया दहशतवाद्यांना बळ देणारे ठरत असून, या माध्यमातून भारतविरोधी कारवाया गतिमान करणे दहशतवाद्यांना सहज शक्य होत आहे. यावर जर नियंत्रण ठेवायचे असेल तर सोशल मीडियावर भारतीय पॉलिसी व कायद्यांची जरब बसविणे गरजेचे आहे, यासाठी दहशतवादविरोधी पथकाने अभियान सुरू केला आहे.

आयसीस आणि इतर अतिरेकी संघटना इंटरनेटवरुन करत असलेल्या जिहादच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी एटीएस तरुणांमध्ये जागती निर्माण करत आहेत. गेल्या महिनाभरात राज्यातल्या 152 शाळा आणि कॉलेजेस मध्ये एटीसच्या कार्यशाळेचं आयोजन झालं, ज्यात 61 हजार तरुणांशी संवाद साधला गेला. या कामासाठी एटीएसच्या 40 ते 50 अधिकार्‍यांची खास टीम प्रयत्न करतं असल्याचं एटीस प्रमुख हिमांशु रॉय यांनी सांगितलं आहे. या उपक्रमात हे अधिकारी कॉलेज तरुणांसाठी प्रेझेंटेशन देत तरूणांना इंटरनेटच्या गैरवापरापासुन सावध केलं जातं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close