संपकरी पायलटस्‌ना एस्मा अंतर्गत कारवाईस हरकत नाही – नरेश गोयल

September 9, 2009 8:59 AM0 commentsViews: 2

9 सप्टेंबर जेट एअरवेजच्या पायलट्सनी कोर्टाच्या ऑर्डर्स पाळल्या नाहीत तर त्यांच्यावर एस्माअंतर्गत कारवाई करण्याला हरकत नाही असं मत जेटचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी व्यक्त केलं आहे. संपाचं हत्यार उपसून प्रवाशांना विनाकारण त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचंही त्यांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना सांगितलं आहे. कोणत्याही परिस्थितीत जेट मॅनेजमेंट पायलटस्‌समोर झुकणार नाही असंही ते म्हणालेत. संप अजूनही मिटला नसल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरुच आहेत. पायलटस् कामावर परतले नाही तर कंपनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर करेलच शिवाय काही अधिक पायलटस्‌नाही निलंबित करेल असा इशारा गोयल यांनी दिला आहे. दरम्यान जेट एअरवेजच्या विमानान टीम जाणार होती. पण या संपाचा फटका भारतीय क्रिकेट टीमलाही बसला, आणि एअर इंडियाच्या विशेष चार्टर विमानाने भारतीय टीम श्रीलंकेला रवाना झाली.

close