नेरूरकर दांपत्याचं बाळ सापडण्याची शक्यता

September 9, 2009 9:03 AM0 commentsViews: 2

9 सप्टेंबर मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमधून गायब झालेल्या बाळाचा शोध लागण्याची शक्यता आहे. मोहन आणि मोहिनी नेरुरकर यांचं बाळ एक जानेवारीला हरवलं होतं. वांद्रे स्टेशनवर रेल्वेमध्ये आठ महिन्यांचा एक अनाथ मुलगा आढळून आला होता. तो मुलगा रेल्वे पोलिसांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीकडे सुपूर्द केला. मिशनरीजनं त्याचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर सायन पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. असं या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस इन्स्पेक्टर शंतनू पवार यांनी आयबीएन-लोकमतला माहिती दिली. हायकोर्टाने मंगळवारी पोलिसांवर कडक ताशेरे ओढल्यानंतर बुधवारी या बाळाची डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे या केसची उत्सुकता अधिक वाढली आहे.

close