सांगली-मिरज दंगल प्रकरणी सर्वपक्षीय बैठकीत निघाला तोडगा

September 9, 2009 9:14 AM0 commentsViews: 21

9 सप्टेंबर सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गणेशविसर्जनासाठी संचारबंदी उठवण्याचं आश्वासन दिलं आहे. बुधवारी दिवसा ही संचारबंदी शिथिल केली जाईल. सांगली-मिरजमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री जयंत पाटील, त्याचबरोबर भाजप नेते, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरीही हजर होते. यासोबतच रिपब्लिकन नेते, शिवसेना नेते आणि मिरजमधील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनीही या बैठकीला हजेरी लावली होती.

close