1984च्या दंगलप्रकरणाचा पुन्हा तपास होण्याची शक्यता

February 2, 2015 8:54 AM0 commentsViews:

09SMSIKHRIOTS_2192861g

02 फेब्रुवारी : 1984च्या दंगलींची नव्याने चौकशी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीने दिल्लीतील 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीचा पुन्हा तपास करण्याची शिफारस केली आहे.

1984च्या दंगलीप्रकरणात पुर्नतपासाची आवश्यकता आहे या पडताळणीसाठी गेल्या वर्षी 23 डिसेंबरला सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश जी.पी. माथूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना केली होती. या समितीने गेल्या आठवड्यात दंगलीसंबंधीचा अहवाल गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवला होता. या दंगलप्रकरणाचा एसआयटीकडून पुन्हा तपास करण्यात यावा अशी समितीने शिफारस केली आहे.

31 ऑक्टोबर 1984 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात शीखविरोधी मोठी दंगल उसळली होती. यामध्ये सुमारे तीन हजार 3325 लोक मारले गेले होते. दिल्लीत सर्वाधिक 2733 नागरिक मृत्यूमुखी पडले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close