राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त टिंग्याला हक्काचं घर नाही

September 9, 2009 12:03 PM0 commentsViews: 3

9 सप्टेंबर टिंग्या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर राज्य सरकारनं शरद गोयेकरच्या कुटुंबाला घर देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही त्यांला घर मिळालेलं नाही. शरदला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण त्याचं कुटुंब मात्र अजूनही माळरानावरच राहतंय. माळरानावरच्या पालात टिंग्याला मिळालेले पुरस्कार ठेवलेत. शरदला पुरस्कार मिळूनही त्यांचं कुटुंब अजून दुर्लक्षितच आहे. कल्याण-नगर महामार्गावर आळेफाट्यापासून 8 ते 10 किमी अंतरावरचं राजुरीगावात उघड्या माळरानावर शरदच्या आईवडिलांचा संसार आहे. एवढं कष्टानं आयुष्य जगत असतानाही, शरदचे आईवडिल आपल्या मुलाच्या यशाने समाधानी आहेत. गोयेकर कुटुंब धनगर समाजातलं मेंढपाळ असल्याने भटकंती करत 16 वर्षापुर्वी राजुरी इथे आले आणि स्थायिक झाले. शरदला पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्युटचे संचालक प्रकाश पाटील आणि प्रिया पाटील यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतलं आणि त्याचं सारं आयुष्यच बदललं. पण कुटुंब मात्र उघड्यावरच राहिलं. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शरद गोयेकरचं कुटुंब असं उघड्यावर किती दिवस राहणार हाच खरा प्रश्न आहे.

close