नागपूरच्या महिला सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द

September 9, 2009 12:06 PM0 commentsViews: 9

9 सप्टेंबर नागपूर महिला सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला आहे . त्यामुळे आधीच संकटात असलेली ही बँक आता बंद होण्याच्या स्थितीत आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिका-यांनी बँकेच्या धरमपेठ मुख्यालयात असलेले आणि बँकेच्या दहा शाखांकडे असलेले बँकिंग परवाने तत्काळ मागवून बँकेला परवाना रद्द केल्याचं पत्र दिलंय. याचा फटका बँकेच्या 68 हजार खातेदारांना बसलाय. रिझर्व्ह बँकेने याबाबत म्हटलं आहे की महिला बँकेची लिक्विडिटी संपली आहे. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 च्या कलम 11(1), 22(3-अ) तसेच 22 (3ब)या नियमाची पूर्तता केली नाही. सद्यस्थितीत बँकेचे व्यवहार ठेवीदांराच्या हितांना पोषक नाही असंही रिझर्व्ह बँकेने सांगितलंय. मुख्य म्हणजे सहा वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाने बँकेने मनमानी कर्ज वाटल्याप्रकरणी बँकेवर निर्बध आणले होते.

close