नाराजीनाट्यावर पडदा, नरेंद्र टंडन यांचा राजीनामा मागे

February 2, 2015 4:28 PM0 commentsViews:

nArenadra tondan

02 फेब्रुवारी : किरण बेदी यांचे प्रचारप्रमुख नरेंद्र टंडन यांनी अखेर राजीनामा मागे घेतला आहे. पक्षाध्यक्ष अमित शहांची भेट घेतल्यानंतर टंडन यांनी राजीनामा मागे घेतल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी सकाळी किरण बेदींच्या कार्यपद्धतीला कंटाळून दिल्ली भाजपचे निवडणूक प्रभारी नरेंद्र टंडन यांनी राजीनामा दिला होता.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फक्त 5-6 दिवस बाकी राहिले असताना भाजपमध्ये नाराजीनाट्य घडले. भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे नरेंद्र टंडन यांनी बेदी यांच्या वागणुकीवर जोरदार आक्षेप घेत हल्लाबोल केला होता. किरण बेदींच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगत त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. पण अमित शहा यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close