भारत-पाक ‘महासंग्रामा’ची बीग बी करणार कॉमेंट्री !

February 2, 2015 6:05 PM0 commentsViews:

big b comentry02 फेब्रुवारी : आपल्या भारदस्त आवाजाने सिनेरसिकांच्या मनावर गारूड घालणारे बॉलिवडूचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची जादू आता क्रिकेटच्या मैदानावरही ऐकायला मिळणार आहे. वर्ल्डकप दरम्यान अमिताभ बच्चन आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार आहेत. भारत-पाकिस्तानच्या काटे की टक्कर मॅचच्या वेळी बीग बी कॉमेंट्री करणार आहे.

बीग बीची ही इंग्लिंश कॉमेंट्री एकेकाळी खूप भाव खाऊन गेली होती…आणि आजही अमिताभ म्हटलं की, त्यांच्या डायलॉगचा उल्लेख होतोच. पण या फिल्मी कॉमेंट्रीनंतर आता अमिताभ प्रत्यक्ष कॉमेंट्री करणार आहे. वर्ल्ड कप मधल्या भारत-पाकिस्तान मॅचच्यावेळी बीग बी कॉमेंट्री बॉक्समध्ये असणार आहेत. कपिल देव, हर्षा भोगले यांच्यासोबत…अमिताभही आपल्या अंदाजात कॉमेंट्री करतांना दिसतील.  अमिताभ बच्चन यांना गातांना आपण बघितलंय. पण त्यांना कॉमेंट्री करताना बघणं ही खरी पर्वणी असणार आहे. अमिताभ क्रिकेटचे चाहते आहेत हे सगळ्या फॅन्सना माहिती आहे. पण आता कॉमेंट्री बॉक्समधून हे क्रिकेटप्रेम आपल्याला दिसेल. शमिताभमधून लवकरच बीग बी पुन्हा चाहत्यांना भेटणार आहेत. त्याचचं प्रमोशन सध्या सुरू आहे. भारत-पाकिस्तान मॅच म्हणजे काटे की टक्कर..आता या काटे की टक्करला बीग बी कॉमेंट्रीचा तडकाही देणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close