किरण बेदींच्या कार्यालयाची तोडफोड

February 2, 2015 8:13 PM0 commentsViews:

bedi office02 फेब्रुवारी : दिल्लीमध्ये भाजपच्या उमेदवार किरण बेदींच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आलीये. त्यांच्या कृष्णनगरमधल्या ऑफिसवर वकिलांना हल्ला केला आणि कार्यालयाची तोडफोड केलीये. या तोडफोडीत दोन जण जखमी झाले आहे.

किरण बेदी नवी दिल्लीच्या पोलीस उपायुक्त असताना 1988 साली दिल्ली बार असोसिएशनच्या सदस्यांवर लाठीचार्ज केला होता.

त्याचा राग म्हणून काही दिवसांपासून दिल्लीत वकिलांचं आंदोलन सुरू आहे. किरण बेदींना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनवू नये अशी या वकिलांची मागणी आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close