आंध्रप्रदेशाचा राजकीय फॉर्म्युला निश्चित

September 9, 2009 12:28 PM0 commentsViews: 2

9 सप्टेंबर आंध्रप्रदेशात वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या राजकीय वारसदाराचा तडजोडीचा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्यानुसार रेड्डी यांचे पुत्र जगनमोहन यांना केंद्रात मंत्रिपद तर काळजीवाहून मुख्यमंत्री रोझय्या पदावर कायम अशी तडजोड होण्याची शक्यता आहे. रेड्डी यांचे जवळचे सहकारी आणि राज्यसभेचे खासदार के. व्ही. पी. रामचंद्र राव यांनी मंगळवारी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कांग्रेस अध्यक्ष सोनियां गांधी यांची भेट घेतली. जगनमोहन यांची बाजू त्यांनी ठामपणे मांडल्याचं समजतंय. रेड्डी यांच्या कुटुंबीयांक डे योग्य लक्ष दिलं जाईल, असं आश्वासन सोनियांनी के. व्ही. पी रामचंद्र राव यांना दिलं.

close