दाऊदवरुन मुंडेंची कोलांटउडी

September 9, 2009 12:34 PM0 commentsViews: 2

9 सप्टेंबरदाऊदला 100 दिवसात पकडू असं नव्हे, तर फरफटत आणू असं आपण म्हणालो होतो, असा शब्दछल करणारा नवीन खुलासा भाजपच्या गोपीनाथ मुंडेंनी केला आहे. कुठल्याही सभेत नव्हे तर पुण्यात पत्रकारांसमोरच मुंडेंनी ही कोलांटउडी मारली आहे. दाऊद नावाची व्यक्ती नव्हे, तर प्रवृत्तीबद्दल आपण बोललो अशी शाब्दिक कसरतही मुंडेंनी केली. आपण गृहमंत्री असताना चारशे एन्कांउटर झाले, त्यातील दोनशे हे दाऊद गँगचे सदस्य होते असंही त्यांनी सांगितलं.

close