दिल्लीच्या तख्तासाठी तब्बल 10 हजार कोटींचा सट्टा !

February 2, 2015 10:29 PM0 commentsViews:

delhi election bettingदिल्ली (02 फेब्रुवारी) : कोण जिंकणार दिल्ली…? हा 10 हजार कोटींचा प्रश्न आहे. बुकी, सट्टेबाजांनी भाजप दिल्लीत सत्तेत येईल, असं वाटतंय. पण सट्टा बाजारात हळूहळू ‘आप’ बस्तान जमवताना दिसतंय. भाजपवर 1 लाख रुपये लावले तर 1.36 लाख मिळतील आणि दुसरीकडे ‘आप’ विजयी झाला तर 2.25 लाख मिळतील. त्यामुळे आता भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

दिल्ली निवडणूक अर्थातच प्रतिष्ठेचा विषय आहे. भाजपने ज्या आवेगाने लोकसभा आणि विधानसभेत बाजी मारलीये. त्यामुळे स्वाभाविकच सट्टा बाजारातही भाजपला जास्त भाव आहे. भाजपवर 10 हजार कोटींचा सट्टा लागलाय. भाजप या स्पर्धेत आघाडीवर असल्याचं बुकीजचं म्हणणं आहे. ‘आप’बद्दलही अनेक अंदाज वर्तवले जात आहेत.

सट्टा बाजारातील उलाढाल
– ‘आप’ला विजय मिळणं कठीण
– भाजपवर 1 लाख लावले तर 1.36 लाख मिळतील
– पण ‘आप’ विजयी झाला तर 2.25 लाख मिळतील
– गेल्या आठवड्यात आपच्या जागा – 22 ते 24
– या आठवड्यात आपच्या जागा – 28 ते 29

दोन्ही पक्षांत जबरदस्त चुरस असल्याने हे दर रोज बदलत आहेत. दहा हजार कोटींचा हा प्रश्न आहे. बेटिंग अनैतिक असलं तरी निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीनं कोट्यवधींची उलाढाल होतेचआणि ती अजूनही थांबवता आलेली नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close