सांगली-मिरजेत आता गुरुवारी गणेश विसर्जन

September 9, 2009 12:44 PM0 commentsViews: 3

9 सप्टेंबर सांगली- मिरज मधल्या गणेशमूतीर्ंचं गुरुवारी विसर्जन होणार आहे. तणावच्या प्रकरणी सांगलीत ढालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला आहे. गृहमंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सांगलीचे पालकमंत्री पतंगराव कदम, मदन पाटील यांच्यासह स्थानिक नेते तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. गणपती विसर्जनाच्या निर्णयामुळे सर्वसामांन्यामध्ये समाधानाची भावना आहे. मात्र दोन्हीही शहरांत सुरक्षा व्यवस्था अजूनही कडक ठेवण्यात आली आहे.

close