काँग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही- गोविंदराव आदिक

September 9, 2009 1:39 PM0 commentsViews: 12

9 सप्टेंबर काँग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गोविंदराव आदिक यांनी दिल्ली येथे केलं. काँग्रेसकडून आघाडीबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याचंही आदिक यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व 288 जागा लढवण्याची तयारी असल्याचंही आदिकांनी म्हटलंय. आघाडी लवकर व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, काँग्रेसकडून आघाडीसंदर्भातला कोणताही निर्णय आम्हाला मान्य असेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

close