दिल्लीत आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष? – सर्व्हे

February 3, 2015 10:40 AM0 commentsViews:

Delhi election

03 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे, असा अंदाज दिल्ली निवडणुकांच्या एबीपी-नेल्सन दिल्लीच्या ओपिनीयन पोलच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आलेल्या या सर्वेनुसार ‘आप’ला बहुमतासाठी केवळ एक जागा कमी पडत असल्याचे दिसते आहे. बहुमतासाठी 36 जागा गरजेच्या असून आपला 35 जागा मिळत असल्याचा अंदाज या सर्वेत वर्तवण्यात आला आहे.

या सर्व्हेनुसार आम आदमी पार्टीला 35 जागा मिळून तो सगळ्यांत मोठा पक्ष बनू शकतो तर भाजपला 29 जागा मिळू शकतात. काँगर्सेची मात्र या निवडणुकीतही पुरती दैना उडण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसला फक्त 6 जागा मिळतील आणि इतरांना एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीतही ‘आप’ने बाजी मारली आहे. सर्वेक्षणानुसार ‘आप’ला 37 टक्के, ‘भाजप’ला 33, काँग्रेसला 18 आणि इतरांना 12 टक्के मते मिळतील. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्रीपदासाठीही ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांना किरण बेदींच्या तुलनेत अधिक पसंती आहे.
किरण बेदींना भाजपनं मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार केल्यानं भाजपला जास्त मतं खेचता येणार नाहीत, असाही अंदाज आहे.

तर दिल्लीकरांचा सर्वात लोकप्रिय नेता कोण असा प्रश्न दिल्लीकरांना विचारण्यात आला. त्यावर 49 टक्के लोकांनी मोदींना लोकप्रिय नेता ठरवलं, तर 42 टक्के लोकांनी केजरीवालांना पसंती दिली. ‘आप’ला कमी उत्पन्न गट, तरूण, आणि मुस्लिमांमध्ये जास्त पाठिंबा मिळतो असून इतरही काही सर्व्हेंमध्ये ‘आप’ला चांगलं यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close