अरूण गवळीच्या भेटीमुळे पोलिसांकडून अर्जुन रामपालला नोटीस

February 3, 2015 12:32 PM0 commentsViews:

rampal and gawli

मुंबई (03 फेब्रुवारी) :  परवानगी न घेता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची भेट घेतल्यामुळे अभिनेता अर्जुन रामपाल अडचणीत सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्याला नोटीस बजावली आहे.

‘डॅडी’ या आगामी चित्रपटात रामपाल गवळीची भूमिका साकारतो आहे. त्यापार्श्वभूमीवर गेल्यावर्षी 29 डिसेंबरला रामपाल याने मुंबईतील जे.जे.हॉस्पिटलमध्ये गवळीची भेट घेतली. मात्र या भेटीसाठी त्याने पोलिसांकडून परवानगी घेतली नव्हती.

मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खूनप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली असून रुटीन चेकअपसाठी त्याला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते, तेवहा अर्जुन रामपालने त्याची भेट घेतली.

दरम्यान गवळीला रुग्णालयात घेऊन जाणा-या पोलिस पथकाचीही अतंर्गत चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close