सांगली- मिरजेतली परिस्थिती नियंत्रणात

September 9, 2009 1:47 PM0 commentsViews: 1

9 सप्टेंबरसांगली- मिरजेतली परिस्थिती निवळतीये. बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान सांगलीतली संचारबंदी शिथील केली जाणार आहे. तर सकाळी 8 ते 12 दरम्यान मिरजमधला संचारबंदी शिथील केला होता. त्यामुळे या दोन्ही शहरांत दैनंदिन व्यवहार सुरू होतायत. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गणपती विसर्जनाच्या निर्णयामुळेही सर्वसामांन्यामध्ये समाधानाची भावना आहे. तणाव निवळल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. गेल्या 8 दिवसांपासून ठप्प असलेले व्यवहार सुरू झाल्याने व्यावसायिकांनाही हायसं वाटतय. मात्र दोन्हीही शहरांत सुरक्षा व्यवस्था अजूनही कायम ठेवण्यात आली आहे. चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र इचलकरंजी शहरात आजही संचारबंदी कायम राहणार आहे. मंगळवारी रात्री संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. शहरातली परिस्थिती पाहुनच दुपारनंतर संचारबंदीमध्ये सुट देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं प्रशासनानं सांगितलं आहे.

close