हरभजनची नव्या वादात

September 9, 2009 2:03 PM0 commentsViews: 2

9 सप्टेंबर मिडीयाचा एक कॅमेरामन हरभजनचा क्लोज शॉट घेण्यासाठी पुढे आला पण त्याचा कॅमेरा भज्जीच्या पगडीला घासुन गेला. त्यामुळे भज्जीला प्रचंड राग आला आणि त्याने त्या कॅमेरामनलाच मारहाण केली. मात्र सुरक्षा रक्षकांनी पुढे येऊन हा वाद मिटवला. बंगळुरुवरुन चेन्नईला जाताना विमानतळावर हि घटना घडली. ऑफस्पिनर हरभजन सिंग याने आयपीएल सिजन एक मध्ये देखील श्रीसंतच्या कानफडात मारुन वाद ओढवून घेतला होता. त्यानतर त्याला शिक्षाही झाली होती. चारच दिवसापूर्वी नंबर प्लेट शिवाय आलिशान हमर गाडी चालवताना हरभजन वादात सापडला होता.

close