भाजपचं व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध, स्मार्टसिटीचा दिला नारा

February 3, 2015 5:21 PM0 commentsViews:

bjp vissionनवी दिल्ली (03 फेब्रुवारी) : भाजपनं आज (मंगळवारी) आपलं व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलंय. भाजपनं जाहीरनाम्याऐवजी हे डॉक्युमेंट काढलंय. जाहीरनाम्याप्रमाणाचे यातही आश्वासनाची खैरात करण्यात आलीये. स्मार्टसिटीचा नारा देत वाहतूक, पार्किंग, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहनांसाठी स्मार्ट कार्ड, पाणी आणि वीज या मुद्द्यांवर या डॉक्युमेंटमध्ये भर दिला गेलाय. दिल्लीकरांसाठी मोफत पाणी आणि स्वस्त वीजेचं आश्वसान देण्यात आलंय. दिल्लीतल्या सांस्कृतिक वारशा जतन करू, स्किल डेव्हलपमेंटवर भर देऊ, अशी आश्वासनं देण्यात आलीये. दिल्ली भाजपचे प्रमुख सतीश उपाध्याय आणि भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या हस्ते हे डॉक्युमेंट प्रसिद्ध झालं.

व्हिजन डॉक्युमेंटमधील ठळक मुद्दे
– प्रत्येक आर्थिक व्यवहाराचा हिशेब ठेवला जाईल
– पोलिसांना तक्रार निवारण करावे लागणार
– महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य
– तरूणांच्या विकासासाठी कटिबद्ध
– सिख दंगलग्रस्तांच्या हितासाठी काम करणार
– परप्रांतातून येणार्‍या लोकांना सुविधा देणार
– मध्यमवर्गीयांसाठी एक लाख घरं बनवणार

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close