विनोद घोसाळकरांची शिवसेनेच्या विभाग प्रमुखपदावरून उचलबांगडी

February 3, 2015 5:59 PM0 commentsViews:

vinod ghosalkar 43मुंबई (03 फेब्रुवारी): शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांची विभागप्रमुख पदावरून उचलबांगडी होणार आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

विनोद घोसाळकर हे शिवसेनेच्या नगरसेविकांनी केलेल्या तक्रारीमुळे अडचणीत आले होते. पण पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रार करुन ही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नव्हती. अखेर महानगर पालिकेच्या येणार्‍या निवडणुका लक्षात घेऊन ही उचलबांगडी झाली असण्याची शक्यता वर्तवली जातेय. सेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे आणि माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली होती. शुभा राऊळ यांनी तर पक्ष सोडून मनसेकडून निवडणुक लढवली होती. आता त्यांची सेनेत ‘घरवापसी’ झाल्यानंतर या भागात नेतृत्वबदल केलं जाईल असं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली असल्याचं बोललं जातंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close