‘सर्वच पक्षांच्या निधींची चौकशी करा अन्यथा सुप्रीम कोर्टात जाऊ’

February 3, 2015 7:37 PM2 commentsViews:

arvind kejrivalनवी दिल्ली (03 फेब्रुवारी) : आम आदमी पार्टीच्या माजी कार्यकर्त्यांनीच ‘आप’ला मिळणार्‍या निधीवरून भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे संतापलेल्या अरविंद केजरीवाल यांनी आता भाजप आणि काँग्रेस पक्षांना मिळणार्‍या देणग्यांची चौकशी करावी अन्यथा सुप्रीम कोर्टात जाण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर स्वत:ला मिळणार्‍या देणग्यांचीही चौकशी करा अशी तयारीच दाखवली आहे.

आपचे माजी कार्यकते गोपाळ गोयल यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर बोगस कंपन्यांकडून लाखोंच्या देणग्या मिळत आहे असा आरोप केला होता. आपला चार वेळा बोगस कंपन्यांकडून 50 लाखांचा निधी मिळाला होता असा आरोप गोयल यांनी केला होता. तसंच आम आदमी पार्टीच्या या माजी कार्यकर्त्यांनी दावा केला होता की, टॅक्स चुकवण्यासाठी ‘आप’ ने अकाऊंट बुकमध्ये फेरफार केलेत.’आप’ने यावर असं म्हटलं होतं की, या देणग्या त्यांना चेकद्वारे मिळाल्या होत्या. गोयल यांच्या आरोपामुळे अस्वस्थ झालेल्या ‘आप’ने आपल्यासोबत तिन्ही पक्षांच्या निधीची चौकशी करा असं पाऊलच उचललंय.

दरम्यान, माजी बँकर आणि आपच्या नेत्या मीरा संन्याल यांनी सीएनएन आयबीएनशी बोलताना अवामनं ‘आप’वर केलेले आरोप खोडून काढलेत. “आपल्याकडे मनी लाँडरिंगविरोधातले नियम अतिशय कडक आहेत. आपल्या बँकांचे कायदे अतिशय कठोर आहेत. अर्थमंत्र्यांनी फक्त बँकांच्या सीईओंना फोन केला तरी त्यांना उत्तर मिळेल. यामध्ये कठीण काहीच नाही.”,असा खुलासा मीरा संन्याल यांनी केला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Shankar Bhadange

    YES ,correct demand by AAP PARTY

  • Shankar Bhadange

    EX-AAP MENBER May be agent of opposite party ,why we give value for his statement ,& his statement how truth ? thats why Kaseriwal demand enquiry of opposite party along with AAP PARTY

close