पेस-भूपती यूएस ओपनच्या सेमीफायनलमध्ये

September 9, 2009 2:15 PM0 commentsViews: 2

भारताचा स्टार खेळाडू लिएँडर पेसनं त्याचा पार्टनर ल्युकास ड्लॉहीसह डबल्सच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. चौथ्या सीडेड पेस ड्लॉही जोडीनं सातव्या सीडेड वेसली मूडी आणि डिक नॉर्मन या जोडीचा पराभव केला. पेस ड्लॉही जोडीनं पहिला सेट 6-3 नं जिंकला. पण त्यांना दुसरा सेट 7-5 नं गमवावा लागला. मात्र तिसर्‍या सेटमध्ये कमबॅक करत त्यांनी सेट 6-4 नं जिंकला आणि सेमीफायनलमध्ये धडक दिली. आता सेमीफायनलमध्ये त्यांचा मुकाबला अव्वल सीडेड अमेरिकेच्या माईक आणि बॉब ब्रायन या जोडीशी असेल.

close