विजेंद्रकुमार वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्ये

September 10, 2009 9:51 AM0 commentsViews: 2

10 सप्टेंबर विजेंद्रकुमारने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे स्पर्धेत त्याचं निदान ब्राँझ मेडल निश्चित आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल मिळवणारा तो पहिला भारतीय ठरलाय. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने युक्रेनच्या सर्जी डेरेयानचेंकोचा 12 – 4 असा एकतर्फी पराभव केला. आता गुरुवारी सेमी फायनलमध्ये त्याची गाठ उझबेकिस्तानच्या अब्बास अटोव्हशी पडणार आहे. अटोव्ह 81 किलो वजनी गटातला गतविजेता आहे. मात्र यावर्षी पहिल्यांदाच तो 75 किलो गटात खेळत आहे.

close