पुण्यात एमआयएम आणि शिवसेना आमने-सामने

February 4, 2015 11:38 AM0 commentsViews:

Owasisi VS Shivsena

पुणे  (04 फेब्रुवारी):  पुण्यात खासदार असादुद्दीन ओवेसींच्या सभेला परवानगी देण्यावरून अजूनही संभ्रम कायम आहे. मुस्लीम आरक्षण परिषदेचे आयोजक आम्हाला परवानगी मिळाल्याचा दावा करत होते. पण पोलिसांनी ओवेसींकडून प्रक्षोभक वक्तव्य न करण्याचे हमीपत्र मिळाल्याशिवाय सभेला परवानगी देणार नसल्याची भूमिका घेतल्याने आयोजकांनी लगेच हमीपत्र सादर केले. त्यामुळे ओवेसींच्या सभेला परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरीही शिवसेनेचा ओवेसींच्या सभेला विरोध कायम असल्याने हा वाद चिघळूही शकतो. ओवेसींची सभा झाली तर शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण सभास्थानी निदर्शनं करणार आहेत. म्हणूनच ऐनवेळी पोलीस हे प्रकरण कसं हाताळतात, याकडे पुणेकरांचे डोळे लागले आहेत.
दरम्यान ओवेसींच्या कार्यक्रमाच्या निषेधार्थ पुणे शहर शिवसेनेच्यावतीने दुपारी 4.30 वाजता निषेध मोर्चाचं आयोजन केले आहे. 
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close