कोकणातील वायंगणी समुद्रकिनार्‍यावर भरलीये कासवांची जत्रा

February 4, 2015 11:37 AM0 commentsViews:

विश्वनाथ उचले, कणकवली (04 फेब्रुवारी) : आपण आजवर अनेक जत्रा पाहिल्या असतील पण आज तुम्ही आपल्याला रुपेरी वाळूत भरणार्‍या एका आगळ्या वेगळ्या जत्रेची सफर अनुभवणार आहेत.

जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर पाळणे, खेळण्यांची दुकानं आणि देव देवतांचे पारंपारिक उत्सव, असं काहीसं चित्र उभे राहतं. पण सध्या कोकणातील समुद्र किनार्‍यांवर एक आगळीच जत्रा भरली आहे आणि तीही कासवांची! समुद्र सृष्टीतून नामशेष होत असलेल्या कासवांचे विश्व पर्यटकांनाही माहित व्हावे या उद्देशाने वेंगुर्ल्यातील वायगणी समुद्र किनार्‍यावर ही कासव जत्रा भरवण्यात आली आहे.

कासवांच्या वाळू शिल्पाने तुमचे स्वागत झाल्यानंतर तुम्हाला खरी खुरी कासवं बघायला मिळतात. त्यातही ओलीव रिडले हे सर्वांच्याच नजरेत भरतं. इथे तुम्हाला फक्त कासवंच नाहीतर त्यांची पूर्ण लाईफ सायकल जवळून पाहायाला आणि समजून घ्यायला मिळते. कासवांची अंडी आणि त्यातून बाहेर पडणारी कासवांची नवजात पिल्ल पाहतांना तर बच्चे कंपनी हरकून जाते.

कासवांची ही जत्रा पाहण्यासाठी सध्या पर्यटकानी वेंगुर्ल्याचा समुंद्र किनारा गजबजून गेला आहे. आता जर तुम्हीसुद्धा कोणणात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या कासवाच्या जत्रेला भेट द्याचा निक्की विचार करा.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close