दिल्लीतल्या शाळेत चेंगराचेंगरी : 6 मुली ठार तर 32 जखमी

September 10, 2009 9:56 AM0 commentsViews: 5

10 सप्टेंबर दिल्लीत खजुरी खास सरकारी शाळेत चेंगराचेंगरीत 6 विद्यार्थिनी ठार झाल्या आहेत, तर 32 जणी जखमी झाल्या आहे. पाण्यात करंट आहे, अशी अफवा पसरल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. जखमी विद्यार्थिनींना GTB हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे तिथले स्थानिक नागरिक चिडले असून त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. घटनास्थळाला भेट देऊन दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांनी मृतांना एक लाख आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

close