पुण्यात H1N1चा 37 वा बळी

September 10, 2009 10:00 AM0 commentsViews: 6

10 सप्टेंबर पुण्यात H1N1चा 37वा बळी गेला आहे. 6 वर्षीय ओम कुर्‍हेचा H1N1मुळे मृत्यू झाला. ओम जुन्नर तालुक्यातील सावरगाव इथला होता. त्याला 8 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी सकाळी 11 वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याआधी पुण्यात आणखी एक बळी गेलेला. विद्या वाठारे या 5 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. विद्या ही भोसरी इथल्या शांतीनिकेतन शाळेच्या सिनियर केजीमध्ये शिकत होती. तिलाही मंगळवारी रात्री 10.40 वाजता ससूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण सकाळी 7.30 वाजता तिचा मृत्यू झाला.

close