मुंबापुरी एलईडीने झळकणार, झोपडपट्टीवर कर लागणार !

February 4, 2015 7:25 PM0 commentsViews:

mumbai budgetमुंबई (04 फेब्रुवारी) : राज्याची आर्थिक राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या महापालिकेचं 2015चा 33 हजार 514 कोटींचा महाअर्थसंकल्प आज (बुधवारी) सादर झाला. यात संपूर्ण मुंबई शहरात सप्टेंबरपर्यंत रस्त्यांवर एलईडी लाईट लावण्यात येणार असल्याचं घोषित करण्यात आलंय. तर दुसरीकडे झोपडपट्टीवरही मालमत्ता कर लागणार आहे.

या बजेटमध्ये कोस्टल रूटसाठी 200 कोटी राखीव ठेवले आहेत. त्याचबरोबर 2015-16 साठीच्या मुंबई पालिकेच्या एज्युकेशन बजेटमध्ये 2,501 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅबची घोषणा करण्यात आलीय. नव्या 202 व्हर्च्युवल क्लासरूम सुरू केल्या जाणार आहेत. पालिकेच्या शिक्षण विभागाची एक वेगळी वेबसाईटही सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचं शिक्षण अर्थसंकल्प 169 कोटी ने कमी आहे. विशेष म्हणजे एलईडी लाईट लावण्याला शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा विरोध आहे. सेनेचा विरोध डावलून एलईडी लाईटलावण्यास हिरवा कंदील पालिकेनं दिलाय. तसंच या बजेटमध्ये झोपडपट्टीवर मालमत्ता कर लावण्याचा विचार सुरू असून तसा प्रस्ताव बजेटमध्ये मांडण्यात आला. या प्रस्तावाला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विरोध केला.

महानगरीचं महाबजेट – 33,514 कोटींचा अर्थसंकल्प

- सप्टेंबरपर्यंत संपूर्ण शहरात एलईडी लाईट
– झोपडपट्टीवर लागणार मालमत्ता कर
– झोपडपट्टी मलनिस्सारण करात 20 टक्के वाढ
– गोरेगाव-मुलुंड लिंक रोडची घोषणा
– कोस्टल रूटसाठी 200 कोटी राखीव
– पीडित महिलांसाठी उपनगरांमध्ये 11 दिलासा केंद्रं
– महापालिकेच्या शाळेतील इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना टॅब
– महापालिकेच्या 4 हॉस्पिटल्समध्ये मानवी दुग्धपेढीची योजना
– महापालिकेच्या 3 हॉस्पिटल्समध्ये योगा थेरपीची योजना
– डंपिंग ग्राऊंडसाठी तळोजा इथे 126 हेक्टर जमिनीची राज्य सरकारकडे मागणी
– ‘राईट टू पी’साठी 5.25 कोटी राखीव
– मुंबई कल्चर फेस्टिव्हलची घोषणा
– पवईत पक्षी उद्यानाची योजना
– बाळासाहेब ठाकरे अखंड ज्योतीसाठी 5 वर्षांची आर्थिक तरतूद
– वैतरणा प्रकल्पातून 25 मेगावॅट वीजनिर्मितीची योजना
– भांडुपमध्ये सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची योजना
– 14 मेगावॅट वीजनिर्मितीचं लक्ष्य

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close