‘पत्रास कारण की…’,नारायण राणेंचं राहुल गांधींना पत्र

February 4, 2015 8:07 PM0 commentsViews:

rane_meet_rahul04 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीत पराभवामुळे खचलेल्या काँग्रेसमध्ये शांतता पसरलीये. आज काँग्रेस नेते नारायण राणे यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना एक पत्र लिहिलंय.

जनाधार असलेल्या नेत्यांनाच पक्षसंघटनेत स्थान द्यावं आणि उपद्रवमूल्य असलेल्या नेत्यांना पदं मिळतात. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची निराशा होते अशी नाराजी राणेंनी पत्रात व्यक्त केली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारुण पराभव आणि पक्षाला आलेली एकूण मरगळ या पार्श्वभूमीवर हे पत्र राणेंनी लिहिलंय. या पत्रातून पक्षसंघटना पुन्हा उभी करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, याचे सल्ले नारायण राणे यांनी राहुल गांधींना दिले आहे.

पत्रास कारण की…
राणेंचा सल्ला क्रमांक 1 :
- जनाधार असलेल्या नेत्यांनाच पक्षसंघटनेत स्थान द्या
- उपद्रवमूल्य असलेल्या नेत्यांना पदं मिळतात. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची निराशा होते.

सल्ला क्रमांक 2 :
- राज्यातल्या नियुक्त्यांसाठी केंद्रीय निरीक्षकांची कोटा पद्धत रद्द करा.
- प्रादेशिक नेत्यांच्या तक्रारीची दिल्लीनं आधी शहानिशा करावी

सल्ला क्रमांक 3 :
- सोशल मीडियाचा जास्त वापर करावा.

सल्ला क्रमांक 4 :
 – पक्षाध्यक्ष, उपाध्यक्षांनी नियमित दौरे करावे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close