‘टीम देवेंद्र @100’मध्ये मुख्यमंत्री आघाडीवर, पंकजा मुंडे दुसर्‍या स्थानावर

February 4, 2015 9:13 PM0 commentsViews:

team devendra @ 100 news04 फेब्रुवारी : राज्यातल्या भाजप सरकारला येत्या 7 तारखेला 100 दिवस पूर्ण होत आहेत. ही संधी साधून आयबीएन लोकमतने महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपल्या मंत्र्यांना त्यांच्या कामगिरीनुसार रेटिंग देण्याचं आवाहन केलंय. आमच्या या आवाहनाला दर्शकांनी उदंड प्रतिसाद दिलाय. पहिल्याच दिवशी संध्याकाळी हजारो वाचकांनी आपल्या स्टार मंत्र्यांना रेटिंग दिलेत. पहिल्याच दिवसाच्या रेटिंगमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी घेतलीये. तर दुसर्‍या क्रमांकावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी बाजी मारलीये. तर तिसर्‍या स्थानावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे आहे. तसंच चौथ्या क्रमाकांसाठी एकनाथ खडसे आणि सुभाष देसाई यांच्यात चुरस आहे.

आमच्या वेबसाईट आयबीएन लोकमतवर रेटिंग चॅट तयार करण्यात आलाय. मंगळवारी रात्री हा रेटिंग चॅट लाईव्ह करण्यात आला.दुसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत हजारो वाचकांनी आपल्या मंत्र्यांना पसंती दिली. त्यामुळे तुम्हीही तुमच्या स्टार मंत्र्यांना रेटिंग देऊन आपलं मत नोंदवू शकता. यासाठी तुम्ही आपलं बहुमोल मत नोदवू शकता आमच्या वेबसाईट www.ibnlokmat.tv वर. महत्वाचं म्हणजे रेटिंग देण्याची मुदत ही 6 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. टीम देवेंद्र मधील स्टार मंत्र्यांना तुम्ही दिलेल्या रेटिंग्चे अंतिम निकाल हे सहा तारखेला संध्याकाळी आमच्या टीम देवेंद्र@100 या विशेष कार्यक्रमाद्वारे जाहीर केले जातील.

कसं करणार रेटिंग ?

रेटिंग बोर्डवर प्रत्येक मंत्र्यांच्या नावाखाली पाच स्टार (*****) आहेत. या स्टारला आपण क्लिक करायचं. तुम्ही अर्धा स्टार ते पूर्ण पाच स्टार रेटिंग देऊ शकता. रेटिंग दिल्यानंतर तुमचं मत यशस्वीपणे नोंदवलं गेलं असं सांगणार एक ‘पॉप्प’ कॉम्प्युटरवर झळकणार.  प्रत्येक स्टार हा 0.1 ते 5.0 इतका अर्थात 1 ते 10 या प्रमाणात आहे. समजा तुम्ही अर्ध स्टार रेटिंग दिलं तर ते 0.1 इतकं असेल. आणि समजा तुम्ही 2 स्टार रेटिंग दिलं तर ते 2.0 म्हणजे 4 इतक रेटिंग असेल. सर्वात महत्वाचं तुम्ही एका कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, टॅबवरून एकदाच रेटिंग करू शकता. दुसर्‍यांदा करू शकणार नाहीत. मग काय वाट कसली बघता द्या रेटिंग ठरवा मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड…अधिक अपडेटसाठी वापरा #100daysTeamDevendra

या मंत्र्यांचं ठरणार रिपोर्ट कार्ड

- एकनाथ खडसे -महसूल, कृषी आणि उत्पादन शुल्क मंत्री
– सुधीर मुनगंटीवार – अर्थ व वन खाते
– विनोद तावडे – मनुष्य बळ, शालेय शिक्षण
– चंद्रकांत पाटील – PWD आणि सहकार खाते
– पंकजा मुंडे – ग्रामविकास, महिला बालविकास

- सुभाष देसाई – उद्योग खाते
– दिवाकर रावते – परिवहन खाते
– रामदास कदम – पर्यावरण खाते
– एकनाथ शिंदे – MSRDC खाते
– डॉ.दीपक सावंत – आरोग्य खाते

- चंद्रशेखर बावनकुळे -ऊर्जा खाते
– गिरीष महाजन – जलसंपदा खाते
– गिरीश बापट – अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close