पुण्यात अवैध दारू जप्त

February 4, 2015 9:24 PM0 commentsViews:

पुण्यातील मगरपट्टा सिटी भागात अवैधरित्या विदेशी मद्य विक्री करणार्‍या ‘ब्रिव्ह बार’वर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली आहे. या धाडीत बारमधून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कंपन्याचे विदेशी मद्य जप्त करण्यात आलं आहे. तसेच या बारमधून मद्य तयार करण्याचे साहित्यही राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून मगरपट्टा सिटितील सिझंन मॉल येथे हा अवैधरित्या दारू विक्रीचा धंदा सुरू होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत बार मालक निलेश फडणवीससह अन्य तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close