शरद गोयेकरला मदतीचे हात

September 10, 2009 10:06 AM0 commentsViews: 45

10 सप्टेंबर टिंग्या सिनेमातल्या शरद गोयेकर या बालकलाकारासाठी मदतीचे हात पुढे आले आहेत. मनसेनं टिंग्यासाठी 1 लाख 51 हजारांची मदत जाहीर केली आहे. तर भाजपनही मदतीचा हात पुढं केला आहे. तसंच खासदार शिवाजाराव- अढळराव पाटील यांनीही मदतीचं आश्वासन दिलंय. टिंग्या चित्रपटात भूमिका साकारणार्‍या शरद गोयेकरच्या वाट्याला अनेक पुरस्कार आले, पण त्याचं कुटुंब मात्र जुन्नरजवळच्या माळरानावरचं जिणं जगत होतं. टिंग्याला मिळालेले पुरस्कारही त्यांच्या माळरानावरच्या पालातच ठेवण्यात आले होते. पण त्याचं कुटुंब मात्र अजूनही माळरानावरचं आयुष्य जगतंय.अशी बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती.

close