नारायण राणे समर्थक नंदकुमार काळे राष्ट्रवादीच्या तंबूत

September 10, 2009 11:46 AM0 commentsViews: 1

10 सप्टेंबरकाँग्रेसमधील राणे समर्थक नंदकुमार काळे गुरुवारी आर.आर.पाटील यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.नारायण राणेंचे समर्थक असलेल्या काळे यांना गोरेगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवायची आहे. पण त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे शरद रावसुद्धा इच्छूक आहेत. त्यामुळे या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नंदकुमार काळे राष्ट्रवादी भवनात दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी नारायण राणे समर्थक शिवसेनेच्या तीन आमदारांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. मात्र 2004च्या विधानसभा निवडणुकीत या ठीकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुक लढवली होती.

close