कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना अखेर अटक

February 5, 2015 12:13 PM0 commentsViews:

128971-trupti-malavi

कोल्हापूर (05 फेब्रुवारी) : लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींना आज (गुरुवारी) अखेर अँटीकरप्शन विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच एसीबीने तत्काळ कारवाई करीत माळवींना अटक केली. आज दुपारी माळवींना कोल्हापूर सेशन कोर्टात हजर केले जाईल.

तब्बेत बरी नसल्याचे कारण पुढे करून माळवी यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज काल (बुधवारी) फेटाळण्यात आला.

गेल्या शुक्रवारी (30 जानेवारी) एसीबीने माळवींसह त्यांचा पीए अश्विन गडकरी या दोघांना 16 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. पण माळवी यांनी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. माळवींच्या अटकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आज अखेर माळवींना डिस्जार्ज मिळताच एसीबीकडून अटक करण्यात आली आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close