राज्यात स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या 250 वर

February 5, 2015 1:21 PM0 commentsViews:

h1n1-ss-03-02-15

05 फेब्रुवारी :  थंडीचा जोर कायम असल्याने स्वाईन फ्लूने संपूर्ण राज्यात थैमान घातला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या 250 वर गेली आहे. दररोज किमान 25 ते 30 रूग्णांची त्यात भर पडत असल्याने रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यातही नागपूर, औरंगाबाद आणि पुणे शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याची अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील एका अधिकार्‍याने दिली.

नागपुरात आजही आणखी एकाचा बळी गेला असून आतापर्यंत 13 जणांचा स्वाईन फ्लूनच्या आजारे मृत्यू झाला आहे, तर 30 जणांवर उपचार सुरू आहेत. थंडीचा जोर कायम असल्याने हा आजार वाढत जात असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, याविषयी सर्व पालिका आणि रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत. सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण आढळल्यास त्यांची स्वाईन फ्लू चाचणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. सुरवातीच्या टप्प्यातच रुग्णाची चाचणी व्हावी, यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये भर देण्यात येणार आहे. राज्य सरकारने स्वाईन फ्लूच्या रूग्णांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी 108 क्रमांकांची रूग्णावाहिका उपलब्ध करून देण्याची सूचनाही केली आहे. त्याशिवाय सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये या रूग्णांसाठी काही बेड्स राखीव ठेवण्यात आले आहे.

काय घ्यावी काळजी

  • सर्दी-खोकला झाल्यावर टेस्ट करून घ्या
  • खोकताना आणि शिंकताना रूमालाचा वापर करा
  • गर्दीच्या ठिकानी जाणं टाळा

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close