जेटचा संपावर तोडगा नाही

September 10, 2009 12:09 PM0 commentsViews: 2

10 सप्टेंबरजेटचा पायलट्सचं आंदोलन तिसर्‍या दिवशीही सुरु आहे. पायलट्स आपल्या मागण्यावर ठाम आहेत. तर जेट प्रशाननानंही कठोर भूमीका घेतली आहे. पायलट्सनी चर्चा करण्याची तयारी त्यांनी दाखवलीये. पण त्यांनी पहिले कामावर येण्याची सूचना जेट प्रशासनाने केली आहे. दोन पायलट्सना कामावरून काढल्याच्या विरोधात जेटच्या देशभरातल्या पायलट्सनी एक दिवसाची सामुहिक रजा घेतली होती. तातडीने कामावर रुजू व्हा, नाहीतर एस्माअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. तरीही ते तिसर्‍या दिवशीही कामावर रुजू झालेले नाहीत. दरम्यान या संपाचा फायदा विमान वाहतूक करणार्‍या इतर कंपन्यानी घेतला आहे. त्यांनी आपल्या तिकीटाचे दर चौपट करून प्रवाश्यांना वेठीस धरलं आहे.

close