मुंबईतही ओवेसींची सभा, पोलिसांची सभेला परवानगी

February 5, 2015 4:07 PM0 commentsViews:

Akbaruddin Owaisiमुंबई (05 फेब्रुवारी ) : एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसींच्या भाषणावरून पुण्यात झालेला वाद ताजा असतानाच आता मुंबईतही एमआयएमचे नेते आणि असादुद्दीन यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसींची सभा होणार आहे. अकबरूद्दीन ओवेसी यांची शनिवारी नागपाड्यात सभा होणार आहे. मुंबई पोलिसांनी या सभेला परवानगी दिली आहे. पण या सभेलासुद्धा शिवसेनेचा विरोध आहे.

पुण्यात बुधवारी मुस्लीम आरक्षण परिषदेत असादुद्दीन ओवेसी यांचं भाषण झालं. पण या भाषणाला परवानगी देण्यावरून बराच वाद झाला होता. शिवसेनेनं ओवेसींची सभा उधळवून लावण्याचा इशारा दिला होता. अखेरीस आयोजकांनी पोलिसांना प्रक्षोभक विधान करणार नाही असं हमीपत्र दिल्यानंतर ओवेसींची सभा होऊ शकली पण तरीही सेनेनं विरोध कायम ठेवला होता. पुण्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शनं केली त्यामुळे शेकडो शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close