कणकवलीत राणेसमर्थकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला

September 10, 2009 1:30 PM0 commentsViews: 3

10 सप्टेंबर भाई कांबळे नावाच्या एका काँग्रेस कार्यकर्त्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घडवून आणल्यानं संतापलेल्या राणे समर्थकांनी भाजपच्या कणकवली तालुका अध्यक्षासह चार जणांना जबर मारहाण केली. यामुळे कणकवलीत पुन्हा एकदा निवडणुकांच्या तोंडावर तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत कॉग्रेसच्या 7 कार्यकर्त्याना अटक करण्यात आली असून त्यांंना 14 तारखेपर्यंत पोलिस कोठडी ठोठवण्यात आली आहे. राणे समर्थक संजय कामतेकर, अण्णा कोदे यांना याप्रकऱणी अटक करण्यात आली. तर, कणकवली पंचायत समिती सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत, कणकवली उपनगराध्यक्ष समीर नलावडे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य रावजी वळंजू आणि तळेरे पंचायत समितीचे सदस्य बाळा जठार या चौघांचा पोलीस शोध घेत आहेत.

close