आज ‘टीम देवेंद्र @100’मध्ये पंकजा मुंडे आघाडीवर, मुख्यमंत्री दुसर्‍या स्थानावर

February 5, 2015 8:43 PM1 commentViews:

team 100 devendra pankaja munde05 फेब्रुवारी : राज्यात भाजप सरकारला येत्या 7 तारखेला 100 दिवस पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण निवडून दिलेल्या मंत्र्यांना त्यांच्या कामगिरीनुसार रेटिंग देण्याचं आवाहन केलंय. मंत्र्यांना रेटिंग देण्यासाठी वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तो अजूनही कायम आहे. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्या क्रमाकांवर होते. पण आज दुसर्‍या दिवशी मात्र, पंकंजा मुडे सर्वाधिक लोकप्रिय स्टार मंत्री ठरल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही मागे टाकलंय.

दुसर्‍या दिवशीच्या स्टार रेटिंग क्रमवारीत पंकजा मुंडे पहिल्या तर फडणवीस दुसर्‍या क्रमाकावर आहेत. त्याच्यापाठोपाठ विनोद तावडे तिसर्‍या क्रमांकावर आहेत. तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी सुभाष देसाई यांना पाचव्या क्रमांकावर मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला आहे. हे सर्व रेटिंग अर्थातच दुसर्‍या दिवसाअखेरपर्यंतचे आहेत. त्यात बदलही होऊ शकतो. म्हणूनच तुम्हीही आपलं मत नोंदवलं नसेल तर तात्काळ आयबीएन लोकमतच्या ibnlokmat.tv वेबसाईटवर जाऊन ‘टीम देवेंद्र’च्या स्टार मंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या कामगिरीनुसार रेटिंग्ज द्या…अधिक अपडेटसाठी वापरा #100daysofTeamDevendra. आपल्या स्टार मंत्र्यांना रेटिंग देण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत….टीम देवेंद्र मधील स्टार मंत्र्यांना तुम्ही दिलेल्या रेटिंग्चे अंतिम निकाल हे सहा तारखेलाच आमच्या टीम देवेंद्र@100 या विशेष कार्यक्रमात जाहीर केले जातील.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Team

    kasli rating desh chalvaila murka basla and rajya chalvaila gadhav basla kasa kai bhartachi bhavisya andharaat jayeel l

close