आरटीओ अधिकार्‍यांना जीवे मारण्याचं धमकी पत्र

February 5, 2015 10:27 PM0 commentsViews:

nagpur  नागपूर (05 फेब्रुवारी) : आरटीओ अधिकार्‍यांना पेट्रोल टाकून जीवे मारू असं धमकी पत्र नागपूरच्या आरटीओ कार्यालयात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे निनावी पत्र आरटीओ परिसरातील दलालांनीच लिहिले असल्याचा संशय आरटीओ अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

या संदर्भात नागपूरच्या सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात नागपूरच्या आरटीओ परिसरातील दोन कार दलालांनी पेट्रोल टाकून जाळल्या होत्या. सुदैवाने ही आग वेळीच नियंत्रणात आल्याने रेकॉर्ड रुम बचावली होती. आता निनावी पत्रामुळे आरटीओ कार्यालयात भीतीचं वातावरण पसरलंय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close