उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

September 11, 2009 7:33 AM0 commentsViews: 3

11 सप्टेंबरराष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा घरचा आहेर दिलाय. राष्ट्रवादीचं बंधन मी मानणार नाही अशी घोषणाही त्यांनी केलीय. ही घोषणा करण्याआधी शरद पवारांशी चर्चा केली असंही त्यांनी स्पष्ट केलं. गरज पडली तर लोकसभेचा राजीनामा देऊन, पुन्हा लोकांच्या समोर जाण्यास मी तयार आहे, असंही ते म्हणाले. उदयनराजे यांनी याआधीही अनेकदा राष्ट्रवादीवर कडक टीका केली होती. जिल्हा बँक आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उदयन राजेंच्या या भूमिकेमुळं सातार्‍यात राष्ट्रवादीला हादरा बसण्याची शक्यता आहे.

close